संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ

Sat, 01 Aug, 2026 07:20
हरिपाठ
 
अभंग 01
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
 
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥१॥
हरींमुखें म्हणा हरीमुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥
असोनि संसारी जिव्हें वेगू करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवाघरीं ॥४॥
अभंग २

चहुं वेदी जाण षटशास्त्री कारण । अठराही पुराणें हरीसी गाती ॥१॥
मंथेनि नवनीता तैसा घे अनंता । वाया व्यर्थ कथा सोडी मार्गू ॥२॥
एक हरी आत्मा जीवशिव समा । वाया तुअं दुर्ग्रमा न घाली मन ॥३
ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ । भरला घनदाट हरी दिसे ॥४॥
अभंग ३

त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरीपाठ ॥१॥
सगुण निर्गुणे गुणाचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथोनी चराचर हरिसी भजे ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मोनि पुण्य होय ॥४॥
अभंग ४

भावेविण भक्ती, भक्तीविण मुक्ती । बळेविण शक्ती बोलो नये ॥१॥
कैसेनि देवंत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वायां ॥
सायास करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
अभंग ५

योगयाग विधी येणे नोहे सिद्धि । वायांची उपाधी दंभ धर्म ॥१॥
भावेविण देव न कळे निःसदेह । गुरुविण अनुभव कंसा कळे ॥२॥
तपेविण दैवत, दिधत्म्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांरो ॥३॥
ज्ञानदेव सांरो दृष्टांताची मात । साधुचे संगती तरणोपाय ॥४॥
अभंग ६

साधुबोध झाला नुरोनिया ठेला । ठायींच मुराला अनुभव ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायीच समाप्ती झाली जैशी ॥२॥
मोक्षरेखें आला भाग्यें विनटला । साधुचा अंकिला, हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी । हरि दिसे जनीं वनीं आत्मतत्वीं ॥४॥
अभंग ७

पर्वताप्रमाणें पातककरणें । वज्‍रलेप होणें अभवक्तासी ॥१॥
नाहीं ज्यासी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत देवहत ॥२॥
अनंतवाचाळ बरळती बरळ । त्य कैसेनि दयाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वाघटीं पुर्ण एकनांदे ॥४॥
अभंग ८

संताचे संगति मनोमारों गती । आकळावा श्रीपति येणे पंथे ॥१॥
रामकृष्ण वाचा भाव जीवाचा । आत्मा जो शिवाचा रामजप ॥२॥
एकतत्वी नाम साधितो साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥
नाममृत गोडी वैष्णवां लाधली । योगिया साधली जीवनकळा ॥४॥
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥
अभंग ९

विष्णुविण जप व्यर्थ ज्ञान । रामकृष्णी मन नाहीं ज्यांचें ॥१॥
उपजोनि करंटानेणें अद्वयवाटा । रामकृष्णा पंठा कैसेनि होय ॥२॥
द्वैताची झाडणी रारुविण ज्ञान । त्या कैचें कीर्तन घडेल नामीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुन हें ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
अभंग १०

त्रिवेणी संगमीं नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥
नामासि विन्मुख तो नर पापिया । हरिविन धांवया न पवे कोणा ॥२॥
पुराणप्रासंद्ध बोलिले वाल्मीक । नामें तिही लोक उद्धरीलें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें नाम जपे हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥४॥
अभंग ११

हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयासी क्षणमात्रें ॥१॥
तृण अग्नीं मेळे समरस झालें । तैसें नामे केलें जपता हरी ॥२॥
हरि उच्चारणीं मंत्र हा अगाध । पळे भूतबाध भय याचें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥
अभंग १२


तीर्थव्रतनेम भावेविण सिद्धी । वायांचि उपाधि करिसी जना ॥१॥
भावबळें आकळे येरवीं नाकळे । करतळीं आवळे तेसा हरी ॥२॥
परीयाचा रवा घेतां भूमीवरी । यत्‍न परोपरी साधन तैसें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें निवृत्ती निर्गुण । दिधले संपुर्ण माझें हातीं ॥४॥
अभंग १३
समाधी हरीची सम सुखेविण । न साहेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥
बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एक्या केशवराज सकळसिद्धी ॥२॥
रिद्धि सिद्धिनिधी अवघोच उपाधि । जंव त्या परमानंदी मन नाही. ॥३॥
ज्ञानदेव रम्य रमलें समाधान । हरीच चिंतन सर्वकाळ ॥४॥
अभंग १४

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्णो वाचा अनंतराशि तप । पापांचे कळप पळतीं पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणता जे वाचा तयां मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाबिजे उत्तम निजस्थान ॥४॥
अभंग १५

एक नाम हरी द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥
समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमावरी हरी झाला ॥२॥
सर्वाघटीं राम देहादेही एक । सुर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥३॥
ज्ञानदेव चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलीया जन्म मुक्त झालो. ॥४॥
अभंग १६

हरिनाम जपे तो नर दुर्लभ ,|वाचेसी सुलभ रामकृष्ण||1||
रामकृष्णनामी उन्मनी साधिली |तयासी लाधली सकळ सिद्धी||२||
सिध्दी बुद्धि धर्म हरिपाठी आले| प्रपंची निमाले साधुसंगे||३||
ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा| तेणे दस दिशा आत्माराम||४||
 
 
अभंग १७

हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय । पवित्र तो होय देह त्याचा ॥१॥
तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप । चिरंजीव कल्प कोटी नांदे ॥२॥
मातृपितृ भ्राता सगोत्र अपार । चतुर्भुज नर होवोनि ठेले ॥३॥
ज्ञानगुढ गम्य ज्ञानदेवा लाधलें । निवृत्तीनें दिधलें माझें हातीं ॥४॥
अभंग १८

हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमागें गेला तो तेथे मुकला । हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडीं सर्वकाळ ॥४॥
अभंग १९

वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचें वचन । एक नाराय्ण सार जप ॥1!!
जप तप धर्म क्रिया नेम कर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥
हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वजिंयेलें ॥४॥
अभंग २०

नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी । पापें अनंत कोडी गेलीं त्याची ॥१॥
अनंता जन्माचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योगयागक्रिया धर्मधर्म माया । गेले ते विलया हरिपाठ ॥३॥
ज्ञानदेवी यज्ञयान क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥
अभंग २१

काळवेळ नामस्मरणासी नाहीं । दोही पक्ष पाही उद्धरती ॥१॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण । जड जीवां तारण हरी एक ॥२॥
हरिनामसार जिव्हां या नामाची । उपमा त्य देवांची कोण वानी ॥३॥
ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ । पुर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥४॥
अभंग २२

नित्यनेम नामीं तो प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयाजवळी ॥१॥
नारायण हरि नारायण हरि । भुक्तिमुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरिविण जन्म नरकवि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहोनि वाड नाम आहे.!!४!!
अभंग २३

सात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्वीं कळा दावी हरी ॥१॥
तैसे नोहे नाम सर्व मार्गा वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥
अजपा जपणें उलट प्राणाचा । तेथेंही मनाचा निर्धारु असे ॥३॥
ज्ञानदेव म्हणे नामविण व्यर्थ । रामकृष्ण पंथ क्रमियेला ॥४॥
अभंग २४

जपतप कर्मक्रिया नेम धर्म । सर्वाघटीं राम भाव शुद्ध ॥१॥
न संडी रे भावो टाकी रे संदेहो । रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥२॥
जात वित्त गोत कुळशील मात । भज कां त्वरित भावनायुक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यांनीं रामकृष्ण मनीं । तेणें वैकुंठभुवनीं घर केलें ॥४॥
अभंग २५

जाणीव नेणीव भगवंती नाहीं । उच्चारणी पाही मोक्ष सद्दा ॥१॥
नारयण हरि उच्चार नामाचा । तेथें काळीकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदाशीं । ते जीवजंतुसी केवि कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायणपाठ । सर्वत्र वैकुठ केले असें ॥४॥
अभंग २६

एक तत्वनाम दृढं धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी
तें नाम सोपा रे रामकृष गोविंद । वाचेसि सदगद जपे आधी ॥२॥
नामापरते तत्त्व नाही रें अन्यथा । वांया आणिका पंथा जाऊं नको ।३॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीं । धरोनी श्रीहरी जपे सदां ॥४॥
अभंग २७

सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहुं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥
जाईल नाममंत्रजप कोटी जाईल पाप । रामकृष्णी संकल्प धरुनि राहे ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी । इंद्रिया सवडी लपुं नको ॥४॥
तीर्थव्रतीं भाव घरी रे करुना । शांती दया पाहुना हरि करी ॥५॥
ज्ञानदेव प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥
अभग २८

अभंग हरिपाठ असती अठ्ठावीस । रचिले विश्वांसे ज्ञानदेवें ॥१॥
नित्यपाठकरीं इंद्रायणीं तीरीं । होय अधिकारी सर्वथा तो ॥२॥
असावें स्वस्य चित्त एकाग्र मन । उल्हासें करुन स्मरण जीवीं ॥३॥
अंतकळीं तैसा सकटांचे वेळीं । हरी तया संभाळी अंतर्बाह्य ॥४॥
संतसज्जनांनी घेतली प्रचेति । आळशी मंवमति केवि तरे ॥५॥
श्रीगुरुनिवृत्तिवचन प्रेमळ । तोषला तात्काळ ज्ञानदेव ॥६॥
 



Leave a Reply