स्वर्गीय झांबर शेठ

Fri, 23 Sep, 2022 08:03
एक महान कर्मयोगी......कै. आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे [झांबरशेठ
लाखो वर्षांनी एखादाच सुर्य क्षितिजावर आपल्या प्रखर किरणांनी तळपताना दिसतो,हजारो वर्षांनी एखादाच चंद्र आपल्या शितलतेने आपल्याला मोहवून टाकतो,कित्येक वर्षांनी एखादाच कोहिनूर झळकताना दिसतो त्याप्रमाणेच समाजकारणात व राजकारणात देखील अनेक वर्षांनी एखादा महान कर्मयोगी जन्माला येतो अगदी त्याप्रमाणेच कै. रामजी सखाराम तांबे व कै.रेऊबाई रामजी तांबे यांच्या पोटी 21 सप्टेंबर 1928 ला एक रत्न जन्माला आले ते म्हणजे श्रीकृष्ण.साहित्य-कला-क्रीडा,शिक्षण,संस्कृती, धार्मिकता, सामाजिकता या विविध अंगाने नटलेल्या या ओतूरगावात नावाप्रमाणेच श्रीकृष्ण हे आपल्या वक्तृत्व- कर्तृत्व-नेतृत्व या गुणांनी झळकू लागले.गुण हे कधीच लपत नसतात. ते प्रत्येक क्षणी न दाखवताही दिसून येतात.पंरपंरागत शेती व्यवसाय सांभाळणा-या शेतकरी कुंटुबात आपल्या कष्टमय व वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या आई-वडिलांच्या संस्कारावर ते लहानाचे मोठे झाले.
घराला घरपण हे मनात घर केलेल्या संस्कृतीमुळेच येते आणि ते त्या घरात राहणा-यांनाच कळते.आपलं घर हे ज्याला कळले ते जगाला नेतृत्व देऊ शकतात.आणि माणसंही जोडू शकतात.याच बळावर त्यांनी अनेक मित्र व माणसं जोडली.माणसांच्या याच साखळीने त्यांना ओतूर गावचे सरपंच केले.नेतृत्व हे सर्वसमावेशक असलं कि बहरत जातं-फुलत जात आणि विकसित होत.1952 ते 1970 या 18 वर्षात ते ओतूर गावचे सरंपच म्हणून राहिले.ते ही अतिशय कार्यक्षम म्हणूनच !
जीवन जगण्याची खरी मजा ही त्यागातच आहे.आणि माणसाचे जीवन हे त्यागानेच परिपूर्ण होते.त्यासाठी माणसाजवळ असावा लागतो विचार.आणि विचार जर सुसंस्कृत बनवायचे असतील त्याला शिक्षणाची जोड असायला हवी.कारण शिक्षणानेच मनुष्य हा आपले ध्येय बळकट करु शकतो. हे त्यांनी ओळखले होते.माझ्या तळागाळातील मुलांची जर प्रगती करायची असेल तर शिक्षणासारखा दुसरा कोणताच पर्याय नाही हे त्यांनी ओळखले होते म्हणूनच सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत पुणे विद्यापीठाची वारी ते करत होते.1968 पासून माझ्या गावाला महाविद्यालय व्हावं हे स्वप्न ते पहात होते.
माणसाच्या कार्यक्षमतेला समाजकारणाची जोड मिळाली कि त्याचा ठसा राजकारणावर उमटतो.त्याच काळात 1962 ला स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाली.जिल्हा परिषद अस्तित्वात आली.काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेतली.पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना ओतूर मढ मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली.1967 मध्ये आळे पिंपळवंडी गटातून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले.त्यावेळी जुन्नर पंचायत समितीत उपसभापती म्हणून त्यांनी काम पाहिले.काही माणसं संधीचं सोनं करतात.आणि इतिहासाचे साक्षीदार बनतात.आपल्या अध्यात्मिक,पौराणिक-सामाजिक-शैक्षणिक पंरपंरेच्या बळावर ते जुन्नर पंचायत समितीचे पहिले सभापती बनले.जुन्नरच्या इतिहासात आजही ते नाव कोरले गेलेले आहे.
समाजाभिमुख काम आणि शांत व मनमिळाऊ कामामुळे ते लोकमान्य असे लोकनेते झाले होते.1972 मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती व त्या निवडणुकीत ते भरघोस मतांनी निवडुन आले होते.मुंबई- पुणे असा नेहमीच प्रवास असल्याने शैक्षणिक प्रवाहाशी कायमच संबंध येत असे.हा प्रवास ते नेहमीच एस. टी. ने करत.सायंकाळी 6.00च्या सुमारास पुण्याहून ओतूरला निघायचे प्रवासात ते फक्त वाचन करत असायचे. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच त्यावेळचे जिल्हयाचे नेते मामासाहेब मोहोळ, कुलगुरु आपटे साहेब व स्व. मधुकरराव चौधरी यांच्याकडे त्यांनी गावाकडे महाविद्यालय उभारणीसाठी सारखा पाठपुरावा केला होता.
कनवाळू-मायाळू-दयाळू आणि प्रेमाची मुर्ती म्हणजे स्व.झांबरशेठ! आज अनेक उपाध्या व सांजशृंगार आपल्याया लोकप्रतिनिधींमध्ये पाहिला मिळतो. दादा-शेठ- साहेब म्हटल्याशिवाय लोकप्रतिनिधी उमगतच नाही.आज पैसा हीच ओळख झाली.कालायतस्मैनमहा!! परंतु साधी रहाणी उच्च या विचारसरणीकडे त्यावेळी होती विनयशीलता. काळ बदलत गेला आज अशा सामान्य परंतु आदर्श व्यक्तींना आपली जनता सुद्धा उभी करत नाही .पण हे सत्य आहे की आपल्या कामाच्या कर्तृत्वावर तुम्ही जनतेच्या गळ्यातील ताईत बनू शकता.यासाठी तुमची कामाची पावती फार महत्वपूर्ण ठरते.आपल्या कामसू व अभ्यासू वृत्तीच्या बळावर त्यांनी आपल्या गावापासून ते तालुक्याच्या विविध गावांच्या तळागाळापर्यत विकासाची गंगा नेण्याचा प्रयत्न केला.आपल्या विचारांचा दर्जाच इतरांच्या सुखाचा दर्जा निश्चित करत असतो.यासाठी लोकांचे प्रश्न हे त्यांनी स्वतःचे प्रश्न समजले.शिक्षणाबरोबरच त्यांनी आरोग्यला प्राधान्य दिले.तालुक्याच्या प्रत्येक गावात आरोग्यकेंद्र उभे रहावे हे त्यांच स्वप्न ! ओतूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र हे जणू त्याच द्योतकच.
जगातल्या कोणत्याही चांगल्या गोष्टीच्या कळसाकडे प्रथम पाहू नये त्यासाठी आधी पायाकडे पहावे.कारण पायाकडे पाहून स्फूर्तीचा साक्षात्कार घडतो. 1970 साली हा महाविद्यालयाचा पाठपुरावा करताना अखेर महाविद्यालयाला परवानगी मिळाली आणि विशेष आनंद म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील गाव पातळीवरचे ते पहिले कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ठरले.कोणतीही चांगली गोष्ट ही त्या गावासाठी व लोकांसाठी भूषणावह बाब असते.अशावेळी दानशूर ग्रामस्थांनी महाविद्यालयासाठी 20 एकर जमिनीचे क्षेत्र उपलब्ध करुन दिल्याने जागेचा फार मोठा प्रश्न सुटण्यास मदत झाली. आजही त्या दानशूर जमीन मालकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.जागेचा प्रश्न सुटला होता परंतु इमारतीचा प्रश्न पुढे उभा राहिला होता. कारण सगळी सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग किंवा नाटक नाही करता येत.कोणतही पाऊल हे धाडसाने टाकल्याशिवाय यश प्राप्त होत नाही. कारण आता पुन्हा देणा-यापुढे पैशासाठी जाता येत नव्हते. शेवटी स्वतःची जमीन एक लाख रुपयांना त्यांनी गहाण ठेवली व इमारतीचे काम नेटाने पूर्ण केले.स्व. यशवंतराव चव्हाण मा.मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाचे उदूघाटन केले आणि ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांसाठी ज्ञान गंगेचे प्रवेशद्वार मुक्त केले.त्यामुळे आज या महाविद्यालयाच्या प्रागंणातून अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी महाराष्ट्र राज्याच्या सेवेत उच्च पदावर , अधिकारीपदावर ,प्राचार्य,प्राध्यापक,शिक्षक, अभियंता,अनेक विभाग ,लेखक-कवी, साहित्य-कला-क्रीडा,विधी-न्याय,संरक्षण दल,पोलिस दल आदि अनेक विभागात कार्यरत आहेत.हे सर्व अभिमानास्पद आहे. परंतु हे सर्व घडले ते केवळ स्व. आ. झांबरशेठ यांच्यामुळे.
मातीने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी मातीसाठी काय करु शकतो हे तर प्रत्येकाचेच प्रश्न असतात. त्यावेळी मराठवाडा विदर्भ या भागातील पाण्याचा प्रश्न हा खुप मोठा गंभीर प्रश्न कि जो आजही आपणास दिसतो.अशावेळी कुकडी प्रकल्प उभा ठाकला.त्यावेळी या प्रकल्पाचे साक्षीदार म्हणून ते पुढे होतेच! त्यांच्या काळापासुनच या गोष्टींना पुढे चालना मिळत गेली.
कारण एवढ्या कष्टाने तसेच दानशुर व्यक्तींच्या बळावर आणि सर्वसामान्य गोर गरीबांच्या दानावर हे काँलेज त्यांनी उभे केले होते.त्यासाठी दिवसरात्र ते स्वतः झटले होते.पण सर्व काही हातातून निसटत चालले होते. अगदी आपटे नावाच्या कुलगुरुंकडे त्यांनी त्याचा भरपुर असा पाठपुरावा केला होता.
त्यातूनच येडगाव धरण, पिंपळगाव धरण व इतर धरणंही नावारुपाला आली.तालुक्याचे प्रश्न इथेच थांबले नाहीत तर या प्रश्नांसाठी अधिक जोमाने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले.स्व. मामासाहेब मोहोळ यांचे ते मानसपुत्र म्हणून ओळखले जायचे.त्यावेळी मामासाहेब हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते तर स्व. बाबुराव घोलप हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सचिव होते.कर्जाचे ओझे वाढतच होते.अशावेळी ग्रामविकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी,व ग्रामस्थांनी काळजावर दगड ठेवत काँलेज चालू राहिले पाहिजे आणि बहुजन समाजाबरोबरच तळागाळातील सर्व विद्यार्थी शिकले पाहिजेत यासाठी जड अंतःकरणाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्वाधीन हे महाविद्यालय करायचे असा निर्णय घेतला. त्यावेळी हे कर्ज फेडण्यासाठी वाघिरे नावाचे गृहस्थ पुढे आले आणि त्यांच नाव देण्यात आले.हा त्यांनी आपला स्वतःचा पराभव मानला.
गर्वामुळे ज्ञानाचा,स्तुतीमुळे बुद्धीचा,आणि स्वार्थामुळे प्रतिष्ठेचा नाश होतो हे ते पुरते जाणून होते म्हणूनच आपल्या शांत- निगर्वी स्वभावाने त्यांनी माणसांची मनं जिंकली होती.तालुक्यातील वीज, पाणी, आरोग्य, रस्ते,शिक्षण या सर्व गोष्टींकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले होते. तालुक्यातील सर्वांगीण गरजा पुर्ण करण्यासाठी दिवसरात्र ते झटत होते. आज राजकारण पुर्णपणे बदलेले आपल्याला दिसून येते. पैशासाठी राजकारण आणि राजकारणासाठी पैसा हे सुत्र सगळीकडेच दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य माणसाकडे फक्त मतदार म्हणूनच पहावयास मिळते.अर्थात ही परिस्थिती आणण्यासाठी मतदारच जबाबदार असल्याचं चित्र आपण पाहतो. परंतु तो काळच वेगळा होता.सर्वसामान्य मतदार किंवा माणूस हा त्या व्यक्तीच्या कामावरच प्रेम करत होता. याच प्रेमाच्या बळावर त्यांना उर्जा मिळे व ते अधिक जोमाने त्या सर्वांसाठी काम करत.आपल्या आमदारकीच्या काळातच मुंबई ही मुख्य बाजारपेठ जर आपल्या ग्रामीण गावांना जोडली गेली तर शेतकरी, उद्योग व व्यवसाय करणा-या सर्वांचाच फायदा होईल यासाठी अणे- माळशेज होण्यासाठी त्याअगोदर त्यांनी अनेक आंदोलने केली.त्यानंतर मराठवावाडा, विदर्भ व इतरही भागांचा त्यामुळे फायदा होणार होता. म्हणूनच स्व.शंकरराव चव्हाण हे त्यावेळी या घाटाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले.त्यांच्यासमवेत मामासाहेब होतेच. यामुळे सर्वसामान्य वर्गाचा खुपच फायदा झाला. नोकरी-उद्योग-व्यवसायाची द्वारे खुली झाली.
त्यामुळेच अणे-माळशेजचे प्रणेते म्हणूनही त्यांची ओळख झाली.संसारात तुझ-माझ असे कोणाचेच काही नसते.जे काही असते ते सगळ्यांचेच असते. म्हणूनच आपल्या आमदारकीच्या काळात 1972 ला जो दुष्काळ पडला त्यावेळी या तालुक्यामध्ये कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले.आणि रोजगार हमी योजने अंतर्गत सगळ्यात जास्त रस्त्यांची कामे त्यांनी हाती घेतली.कोपरे-मांडवे, मुथाळणे- जांबुळशी,इंगळून-पासून ते नाणेघाटापर्यत रस्त्याच्या खडीकरणाची कामे त्यांनी हाती घेतली.अहोरात्र ते आपल्या मतदारसंघातील गाववोगाव आणि वाड्यावस्त्यांना भेट देत होते. सरकारी मदत व सहकार्य सर्वोतोपरी देत होते.या धावपळीमध्ये शाररीक अतिश्रम होत होते.पण जीवाची पर्वा न करता माणसांमधला हा माणूस केवळ माणसांसाठीच पळत होता.याच अतीश्रमामुळेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र असा झटका आला. बाँब्मे हाँस्पिटलला त्यावेळी स्वतःची तब्बेत व्यवस्थित नसतानाही काठी टेकवत टेकवत आपल्या मानसपुत्राला भेटण्यासाठी मामासाहेब मोहोळ आले होते.तो दिवस भाद्रपद पोळ्याचा होता.पवारसाहेबांवर व त्यांच्या शब्दावर त्यांची अपार श्रद्धा होती.परंतु काळ थांबण्यास तयार नव्हता.अखेर 26 सप्टेंबर 1973 ला जुन्नर तालुक्याचा हा कर्मयोगी व ओतूरचा भुमीपुत्र अनंतात विलीन झाला.त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना पवारसाहेब त्यांचे पार्थिव ओतूरला घेऊन आले आणि अंत्यविधी पारपडेपर्यत परिवाराचे सांत्वन करत राहिले.त्यानंतर मात्र पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचेमा.अध्यक्ष मामासाहेबांनी दिलेला शब्द मा.अध्यक्ष तथा मा. खासदार स्व. रामकृष्णजी मोरे यांनी तो शब्द पाळला त्यांचे नाव ग्रंथालयाला तर पवारसाहेब यांच्या शुभहस्ते संरक्षणमंत्री असताना त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पण त्या भाद्रपद पोळ्याला मात्र ओतूरकरांनी जे दुःख भोगले त्याचे शब्दात वर्णन करता येणं शक्य नाही. पण हजारोंच्या उपस्थितीत या लोकनेत्याला साश्रुनयनांनी जनतेने निरोप दिला होता.त्यानंतर 1974 ला जुन्नर व सोलापूरची पोटनिवडणूक झाली.सोलापुरच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसचे सुशिलकुमार शिंदे तर जुन्नरच्या पोटनिवडणूकीत स्व. आमदार झांबरशेठ यांच्या पत्नी श्रीमती लतानानी या प्रचंड मताधिक्याने जुन्नरच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या.परंतु हे सगळ होत असताना जनतेने आपल्या लोकनेत्याला निरोप दिला होता. रविवार दि.25.09.2022त्यांचा स्मृतिदिन.अशा या महान कर्मयोग्यास त्यांच्या 49 व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन...!!!



Immollisk

Fri, 27 Jan, 2023 09:34

priligy for pe Dis Esophagus

Immollisk

Tue, 31 Jan, 2023 10:22

Research studies have shown that lncRNAs mainly interact and exert their action on nearby protein coding gene targets where can i buy cialis on line

Immollisk

Sun, 05 Feb, 2023 01:33

Long- term use of estrogen- only hormone therapy linked with increased risk of ovarian cancer best place to buy generic cialis online Patch tests with reading at 72 and 96 hours are recommended for the diagnosis of non

Spotbah

Fri, 12 May, 2023 12:18

i have never felt pain like that and i have battled endometriosis and fibromyalgia for the last 15 plus years buy cialis professional How To Correct High Blood Pressure Without Medications

edgessy

Mon, 15 May, 2023 10:14

buy cialis canadian 1 had complementary relationships

gclubvip888

Tue, 06 Jun, 2023 07:31

gclub888888 good game form thailand

gclubfish888

Tue, 06 Jun, 2023 07:36

การเล่น Casino Online ที่สามารถรองรับระบบของ ทางเข้าจีคลับ ในการเข้าใช้งานผ่านทาง มือถือ และ คอมพิวเตอร์ PC ได้ทุกระบบ

olqhdSTBX

Wed, 02 Aug, 2023 02:58

buy cialis online europe De G Buff Passone C, Kuperman H, Cabral de Menezes Filho H

PxsNELpgD

Sun, 27 Aug, 2023 03:46

bag H R All Purpose Flour Unbleached 50lb buy cialis generic online cheap

Leave a Reply