मा.आमदार कर्मयोगी झांबरशेठ

Sat, 24 Sep, 2022 07:18
जुन्नर तालुक्याचे शिल्पकार -----
कै. श्रीकृष्ण रामजी तांबे उर्फ झांबरशेठ तांबे
(माजी आमदार)
----------------------------------------------

ऐसे गोत्र पवित्र उत्तमापूर तीर्थक्षेत्र, चैतन्य सद्गुरु समाधिस्थ.
तज्ज राघव चैतन्य केशव चैतन्य, व्यासांची कृपा तेथे असे.

संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याकडून सर्वसामान्यांच्या मुक्तीसाठी मिळालेला,
राम कृष्ण हरि‌‌हाच मंत्र
व दृष्टांताचा साक्षात्कार ह्याच पावन पवित्र भूमीतला".
ओतूरचा आरा
अन्
पिंपळवंडी चा सारा
असा हा सुख संपन्न आनंदी पसारा"
तो याच भूमीतला.

ह्याच भूमीने महाराष्ट्राच्या धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक साहित्यिक व राजकीय वैभवात भर टाकलेली आहे.
हेच ओतूर गाव आज घडीला महाराष्ट्राच्याच काय पण देशाच्या इतिहासात अजरामर होऊन गेलय.

भारताचे पहिले शिक्षक व थोर समाजसेवक :"महात्मा ज्योतिबा फुले व महाराष्ट्राच्या पहिल्या महिला स्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने ओतूरच्या भूमीत चरण स्पर्श केला.
आणि त्या दोघांनी ह्या भूमीला एक कानमंत्र दिला.

पाटी दप्तर हातात घ्या, अन ज्ञानाच कुंकू कपाळी लावा"
मगच दिवाळी दसरा साजरी करा

सुज्ञ अन् ज्ञानाची आवड असणाऱ्या सर्व ओतूरकर मंडळींनी त्यांचा शब्द झेल्लाच नाही; तर तात्काळ अमलातही आणला.
आणि खरोखरच एक चमत्कार झाला. ग्रामीण भागातील शिक्षणाची गंगा ओतूरकडून पुणे जिल्ह्यात ज्ञानाने, कर्तृत्वाने आणि आणि अभिमानाने वाहू लागली व ओतूरच्या शिक्षकांना त्यांच्या स्वकर्तुत्वाने आदरपूर्वक मान-सन्मान प्राप्त होऊ लागले.
कर्तुत्वाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात कला- कौशल्यांनी बहरलेली नानाविध माणसांची मांदियाळीच ओतूरला पाहायला मिळाली.

कोणी पोलीस सेवेत सर्वोच्च स्थानी पोहोचलय,
कोणी डॉक्टर म्हणुन नामांकित झालय,
कोणी क्रिकेटचे मैदान गाजवतोय,
तर कोणी शालांत परीक्षेत सर्वोत्कृष्ट ठरलय
कोणी दूरदर्शन पडदा गाजवलेला,
कोणी साहित्यिक म्हणून नावाजलेले,
कोणी शब्द पंढरीच्या वारकर्‍यांनी राष्ट्रपतीपदका पर्यंत गवसणी घातलेली,
तर कोणी सृजनशील नेतृत्व करून जनमानसात लोकप्रियता मिळवलेली.

पूर्वीच्याकाळी गावच्या गाव गाड्याचा प्रगतीचा आढावा खुलेपणाने व पारदर्शी पद्धतीने नागपंचमीच्या दिवशी पांढरीच्या मारुतीच्या मंदिरासमोरील व्यासपीठावर चालायचा.(तीच जपलेली परंपरा आजही अखंडपणे सुरू असलेली दिसून येते.) जेव्हा गाव गाड्याची चर्चेची बैठक असायची, तेव्हा कोणीही तरुण तिकडे फिरकत नसायचा त्याला अपवाद होता फक्त छोटा श्रीकृष्ण.लोकांच्या विश्वासाला व आदराला पात्र असलेल् जुन्या गाव गाड्यातील एकमेव नाव होतं हरी गेनुजी तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भिका आप्पा तांबे, भाऊ मास्तर डुंबरे या गाव पुढाऱ्यांनी श्रीकृष्णाची तल्लीनता, सामाजिक कार्याची आवड, पाहून त्यांना अगदी पारखून निरखून घेतलं. संपूर्ण गावच्या एकमुखी निर्णयामुळे ओतूरच्या सरपंच पदाची माळ श्रीकृष्णाच्या गळ्यात पडली.------------अन इकडे सुद्धा -----------. लताबाईंनी श्रीकृष्णालाच माळ घातली.

उंब्रजच्या दांगट घराण्याची पुण्याई फळा आली
लेक लाडकी या घरची तांबे घराण्याची सून झाली.

नऊवारी साडीतला घरंदाजपणा ज्यांच्याकडे पाहिल्यावर दिसत होता, डोक्यावरचा पदर जणू शालिनीतेचाच महिमा गात होता. तेव्हा लताबाई एखाद्या राजघराण्याची राजमाता शोभायची आणि झांबरशेठच्या बेरजेचे राजकारण जवळून पाहायची.
पती धर्माचं पालन करता करता चार पुत्र प्राप्तीच्या आनंदात रममाण व्हायची. गावच्या सरपंच पदाच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांनी गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला होता.
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपद ही त्यांनाच प्राप्त झाले होते.
विकासाचा ध्यास,सकारात्मक दृष्टिकोन व संघटन कौशल्य यांच्या बळावरच जुन्नर तालुक्याचे १ले सभापती पदाचा मान
आणि
त्याच दर्जाचे केलेलं काम "
अजूनही स्मरणात राहते.जुन्नर पंचायत समितीच्या दगडी इमारतीची सुरेख वास्तू आजही सर्वांचं लक्ष वेधून घेते.
ओतूर- मढ गटाचे बिनविरोध सदस्यपद पुणे जिल्हा परिषदेत गाजत होते;
कारण नवनवीन कामे मार्गी लागत होती; म्हणून जिल्हा परिषदेचे उपसभापती पदीही त्यांचीच वर्णी लागली आणि जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सुसज्जता प्राप्त झाली. विजेचा लपंडाव थांबला गेला. वीज नियमित केली गेली. रस्त्याची डागडुजी व नवीन रस्त्यांची कामे मार्गी लागली.
नवीन- नवीन प्राथमिक शाळा इमारतींमधून
सरस्वतीची आराधना सुरू झाली.

१९५२ सालापासून झांबरे शेठ हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने पक्षाचा व पक्षश्रेष्ठींचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास निर्माण झाला होता; त्या काळी जुन्नर काँग्रेसचा सात्विक चेहरा म्हणजेच श्रीकृष्णशेठ उर्फ झांबरशेठ (नाना) होय.धनाची श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी असलेला माणूस म्हणजे झांबरेशेठ होय.
काँग्रेस पक्षाने त्यांना आमदारकीची उमेदवारी दिली खरी; परंतु आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने संपूर्ण गावकऱ्यांनी कंबर कसली मग प्रचाराची वर्गणी जमा झाली, सुंदर नियोजन केले गेले, एकीचे बळ त्यामुळे मिळालेले फळ म्हणजेच झांबरे शेठ आमदार झाले.

जुन्नर तालुक्यात प्रगतीची पावले वेगाने पडायला सुरुवात झाली.

ज्याचे घरी नाही धन,
त्याची विद्या असे धन,
शिकावयाचे कारण,
हेचि असे जाण पां.

जगण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता घेता येणे म्हणजेच खरे शिक्षण.
. हाच शिक्षणाचा संस्कार माझ्या तालुक्याच्या घराघरात व लोकांच्या मनामनात पोहोचला; तरच समाजाची खरी उन्नती.
हा मंत्र सजग असलेल्या झांबरशेठला मनोमन पटला,
व त्यांच्या अंतकरणात जोरदार ठसला.
शिक्षणा विना कोणी विद्यार्थी वंचित राहणार नाही ही अंतरीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना.

वाटेल ती किंमत मोजू,
पण सरस्वतीचे मंदिर आनंदाने खोलू.
ही खूणगाठ मनाशी बांधली गेली, ‌निर्धार ठरला,
मग शिक्षण गंगेचा गोवर्धन उचलण्यासाठी अनेकांनी हातभार लावला.
तरीही वर्गणी कमीच पडली,
मग बँक आडवी आली,
तेव्हा झांबरशेठ ने स्वतःची जमीन बँकेला तारण ठेवली."
म्हणूनच म्हणावेसे वाटते,

समाजाचे दूर केले त्यांनी अज्ञान,
उत्तर पुणे जिल्ह्यात
सुरू केले
ग्रामीण भागातील
पहिले महाविद्यालय विज्ञान

त्यानंतर ओतूर, उदापूर, डिंगोरे व धोलवड या ४ ठिकाणी विद्यालय सुरू केली.
त्यानंतर आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्याही जीवनामध्ये प्रगतीची गंगा यावी. हा उदात्त हेतू ठेवून गाडगे महाराज विद्यालय सुरू करणे कामी खूप प्रयत्न केले ; प्रसंगी चैतन्य विद्यालयाचे ४ शिक्षक त्या ठिकाणी पाठवले व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
ओतूर कॉलेजच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची मोफत सोय शिक्षणप्रेमी आमदार झांबरेशेठकडुन करण्यात आली होती. ओतूर मधील मराठी शाळेचे उद्घाटनासाठी सन्माननीय बाळासाहेब देसाई यांना निमंत्रित करून शिक्षणाचा श्रीगणेशा त्यांनी गावागावात सुरू केला.

प्राथमिक शाळेच्या गावां गावांमध्ये नवीन इमारती उभ्या राहिल्या,
तेव्हाच विद्यार्थ्यांच्या चांगल्या पिढ्या
निर्माण झाल्या.

अशा प्रकारे कै.कर्मवीर भाऊराव पाटील ,
कै.बा रा घोलप साहेब,
कै. प्राचार्य सबनीस साहेब,
कै. चांदमल भाऊ बोरा साहेब,
या शिक्षण महर्षी प्रमाणेच
छोट्या गावचा,
मोठा शिक्षणमहर्षी
झांबरशेठ ठरले.
मद्यांलयाऐवजी विद्यालयांची
उभारणी करणारा,
स्वच्छ प्रतिमेचा व
प्रचंड प्रतिभेचा" असा हा
सुसंस्कृत नेता. त्याकाळी खूप लोकप्रिय ठरला.

आज हजारो विद्यार्थी व ओतूर महाविद्यालयांमधून व या चार विद्यालयामधून शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात यशस्वी होताना दिसत आहेत ही झांबर शेठची पुण्याई आहे.
(आज घडीला ओतूर महाविद्यालय व धोलवड विद्यालय ग्राम विकास मंडळ ओतूर या संस्थेच्या ताब्यात नाहीत.)

जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर बरीचशी मान्यवर मंडळी होती; त्यामध्ये झांबर- शेठही होते. पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी व ४ जिल्ह्यांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प होऊ घातलेला होता; परंतु सरकार व प्रकल्पबाधीत शेतकरी यांचा समन्वय न बसल्यामुळे यशवंतराव चव्हाण साहेबांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

तेच पवित्र पाय सरस्वतीच्या प्रांगणामध्ये घेऊन येणारे झांबरे शेठ होते.
त्यावेळेस ओतूर महाविद्यालयाचे उद्घाटन करताना प्रास्ताविकामध्ये आमदार श्रीकृष्णशेठ म्हटले, गोरगरिबांच्या मुलांना पुणे-मुंबई सारखे दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी मी हे कॉलेज स्थापन करण्याचा प्रयत्न केला; यासाठी मला अडचणीही आल्या, त्या सर्व अडचणींवर मात करत- करत मी इथपर्यंत आलो आहे.
आता इथून पुढे मात्र माझ्या कॉलेजला एकही पैसा कमी पडणार नाही, कारण देशाच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातामध्ये आहे; तेच देशाचे अर्थमंत्री चव्हाण साहेब माझ्यापुढे बसलेले आहेत.असे म्हणताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबही खळखळून हसले. लोक उलटीपालटी होऊन एकमेकांना टाळ्या देत सुटली होती.
नंतर चव्हाण साहेब उठले व भाषणात म्हटले की झांबरे शेठ
हे एक हजरजबाबी व प्रेमळ व्यक्तिमत्व आहे.
त्यांनी खूप सुंदर वाक्य वापरलय, आता मलाही कुठेतरी वाटतय; की एखादी घोषणा करून तिजोरी खोलावी. मी १०००० / रुपये देशाच्या तिजोरीतून महाविद्यालयासाठी देणगी जाहीर करतो. पुन्हा पाच मिनिटे टाळ्यांचा कडकडाट होत राहिला.
असा हा शिक्षण प्रेमी आमदार फक्त नेत्यांच्याच नाही; तर संपूर्ण समाजाच्या पसंतीस उतरलेला होता.

सह्याद्रीच्या या भूमिपूत्राच्या कर्तृत्वाचा आणि प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढताच राहिला. १९७२ च्या प्रचंड दुष्काळाच्या झळा संपूर्ण महाराष्ट्रावर पडल्या होत्या, दुष्काळा आ वासून पुढे उभा होता, आकंड तांडव करत होता. प्रसंग मोठा बाका होता,
संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे,

बुडता हे जन, न देखवे डोळा.
येतो कळवळा म्हणऊनी.

तेव्हा वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना मंत्रालयातून सर्वात जास्त रोजगार हमीच्या योजना जुन्नर तालुक्यात घेऊन येणारा पहिला कार्यसम्राट आमदार म्हणजेच श्रीकृष्णशेठ तांबे होय.

निसर्गाची साधी भोळी लेकरं म्हणजेच आदिवासी समाज होय
.कारण गोरगरीब आदिवासी जनतेच्या हाताला काम पाहिजे, त्यांना पोटभर अन्न मिळाले पाहिजे.
ही भावना त्यांच्या अंत:करणात होती. म्हणूनच कोपरे- मांडवे- मुथाळणे या नागमोडी घाटाचं काम अतिशय सुंदर पद्धतीने रोजगार हमीच्या योजनेतून त्यांनी करून घेतलं. लोकांची दळणवळणाची सोय झाली.
पोटा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला होता. म्हणूनच आदिवासी जनता खूश झाली होती.
म्हणूनच अजूनही या आदिवासींच्या घरांमध्ये झांबरशेठ यांचे फोटो पहायला मिळतात.
त्यानंतर पुणे व नगर हे २ जिल्हे जोडण्याचं काम बदगी - बेलापूर ह्या घाटाने पूर्ण केलं.
लोकांचा जाण्या- येण्याचा प्रश्न मिटला होता. काळाची गरज ओळखून, ओतूर- पुणे ही एसटी सुरू करण्यासाठी झांबरे शेठ यांनीच त्यावेळी प्रयत्नांची शिकस्त केली. शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावे यासाठी छोटा साखर कारखाना (खांडसरी )काढण्याचेही प्रयोजन होतं; परंतु तो प्रयत्न अपूर्ण राहिला.

संपूर्ण आयुष्यभर सायकलवर व
एस टी ने प्रवास करणारा,
प्रवासातही सतत पुस्तके वाचणारा, कणखर मनाचा व परखड विचारांचा हा नेता सर्वांच्याच अंत:करणात जाऊन बसला
त्यावेळी शंकराव चव्हाण साहेब, मामासाहेब मोहोळ, डि के राजर्षी साहेब (माजी आमदार ठाणे) या व इतरही अन्य नेत्यांसमवेत श्रीकृष्णशेठ यांनी माळशेज घाटाचा शुभारंभ केला.
सतत २ महिने घाटावर थांबून, कामाचा दर्जा राखणारा व वेळोवेळी कामगारांनाही प्रोत्साहन देणारा जुन्नर तालुक्याचा हा पहिला विकास पुरुष ठरला.

फोडून माळशेज घाट,
तयार केली नवीन वाट,
बांधकामाला नाविन्याचा थाट
प्रगतीची फुटली पहाट
झांबरशेठची ही दूरदृष्टी----
आज पाही सर्व जीवसृष्टी
आनंदाने -- -- - --- -सुखा समाधानाने

अत्यंत कल्पक, मेहनती व आत्मनिर्भर व अभ्यासू तसेच संपूर्ण आयुष्य जनतेच्या सुखासाठी त्यागणारा एक कर्तबगार व जबाबदार आमदार म्हणजे झांबरेशेठ होय.
सतत पायीपीट,एस टीचा प्रवास, जीपचा प्रवास, कामांचे नियोजनाची जबाबदारी, दुष्काळाचे सावट, त्यासाठी झालेली प्रचंड शरीराची ओढाताण व दगदग, नाजूक प्रकृतीच्या झांबरशेठ चे कामाच्या नादात स्वतःच्या प्रकृती कडे झालेले दुर्लक्ष त्यामुळे तब्येतीवर प्रचंड ताण आला. व प्रकृती खालावली म्हणतात ना! एका सुखाच्या मागे दुःख लपलेलं असतं - - - -- -- --
अमावस्या भाद्रपद पोळ्याचा तो दिवस होता. (माळी, पाटील डुंबरे, चौगुले -गाढवे ) यांच्यापैकी आत्माराम रामचंद्र गाढवे (मामा )यांची मानाची व इतरही मानकऱ्यांची बैल रंगवून, सजवून मारुतीच्या चौकात येऊन थांबली होती.
- - - - अचानक मुंबई वरून आलेल्या निरोपाने ओतूरच्या काय ? पण संपूर्ण महाराष्ट्रावर काळीकुट्ट अमावस्या पसरली.
कारण झांबरशेठ ( नाना ) आपल्याला सर्वांना सोडून गेले होते.
कैलासवासी झाले होते. (मृत्यु दि. २६ सप्टेंबर १९७३) त्यादिवशी लोकांनी पोळ्याचा स्वयंपाक तसाच ठेवून, लोक उपाशी झोपली होती.
कोणीही त्या दिवशी सण साजरा केलेला नव्हता; एवढे तीव्र दुःख झालेलं होतं.

भाद्रपद अमावस्ये ला होता बैलपोळा,
झांबरेशेठच्या मृत्यूच्या बातमीने
लोक झाली गोळा
ओतूर आणि तालुक्याच्या स्वप्नांचा झाला चोळा-मोळा
लोकं रडता रडता म्हणत होती
आमच्या माणसातला देव गेला.......
आमच्या माणसातला देव गेला....

संपूर्ण आमदार मळा शोकसागरात बुडाला.......
नातेवाईक खिन्न, ओतूर सुन्न, आज खऱ्या अर्थाने गावकी- भावकीच पांघरुन गेल. लोकांचा हक्काचा आधार गेला; आणि संपूर्ण जुन्नर तालुका पोरका झाला.

हा- हा म्हणता वाऱ्यासारखी ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली.
मांडवी नदीच्या पवित्र किनारी कै.
झांबरशेठचा ( नानांचा) पवित्र पार्थिव देह ठेवला गेला. लोकनेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते चंदनाचा हार घातला गेला.मांडवी नदीला आलेला पूर ओतूरकरांनी अनेक वेळा अनुभवला; परंतु कै. झांबरशेठ च्या अंत्यविधीच्या वेळी गावाला आलेला लोकगंगेचा महापूर लोकांनी पहिल्यांदाच डोळे भरून पाहिला. तेव्हा शरद पवार साहेब म्हणाले की,
,"झांबरेशेठ म्हणजे जनाधार लाभलेला एक असामान्य व्यक्तिमत्त्व होय.
असा हा निस्वार्थी व लोकप्रिय आमदार सदैव जनतेच्या स्मरणात राहील."
आज घडीला पवार साहेबांचे शब्द खरेच ठरत आहेत.

"शिक्षणाची गंगा घरोघरी आणून शिक्षण महर्षी ठरलेला,
दुष्काळाच्या वेळी रोजगार हमीची योजना संपूर्ण जुन्नर तालुक्यात आणून लोक जगवणारा कार्यसम्राट आमदार. त्याकाळी कोणताही मोठा निधी
उपलब्ध नसताना दुष्काळातही मोठमोठ्या घाटांची काम करणारा, जुन्नर तालुक्याचा हा पहिला विकास पुरुष ठरला."

संपूर्ण जुन्नर तालुक्या तर्फे झांबरशेठ या कार्यसम्राट आमदाररास विनम्र अभिवादन.

आज रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी श्रीकृष्णशेठ उर्फ झांबरेशेठ (नाना ) यांची ४९ वी पुण्यतिथी त्यानिमित्त ग्राम विकास मंडळ, ओतूर येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व झांबरशेठ यांच्या कार्या सारखच काम करणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.आजही कै. झांबरशेठच्या कार्य कर्तुत्वाच व स्मृतींचं स्मरण अतिशय गौरवास्पद पद्धतीने सुरू आहे.ही खूप अभिमानास्पद व स्तुत्य बाब आहे.
-----------------------------------------------
महेंद्र मल्हारी बोऱ्हाडे ( सर)
महालक्ष्मी विद्यालय उंब्रज १
ता. जुन्नर जि. पुणे
(लेखक, व्याख्याते, कवी, निवेदक,
चित्रपट व नाट्य कलाकार,
इंग्रजी भाषा तज्ज्ञ मार्गदर्शक
(जुन्नर तालुका व पुणे जिल्हा)
(वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा परीक्षक)
पुणे विद्यापीठ व राज्य पातळी.
-----------------------------------------------Immollisk

Fri, 27 Jan, 2023 09:16

The oncologist needs a full suite of features such as staging of tumors, data intensive workflows, features for chemotherapy dosing and administration, assessment of toxicity, management of clinical trials, and tracking of drug inventories

Immollisk

Sat, 28 Jan, 2023 08:01

stromectol reviews Many individuals with CP who walk but don t receive regular physical therapy are actually worse off than their peers in wheelchairs because of the stress on their joints

Immollisk

Wed, 01 Feb, 2023 09:12

is there a generic cialis available Service Package photos would be provided for you to tell apart the steroids

Immollisk

Thu, 02 Feb, 2023 06:28

Fisher s exact time of the risks of gestational diabetes buy roaccutane online uk

Leave a Reply